Tuesday, May 4, 2010

एबनी ची देखणी

मागच्या लेखावर जास्त प्रतिक्रीया न मिळाल्यामुळे थोडा खचलो आहे. विचार केला कि असे पण लोक वाचणार नाही आहेत. म्हणून एक मराठी लेख लिहावा. या वेळेला प्रतिक्रीया अपेक्षित नाही. याचा अर्थ असा नाही कि कोणी माझा अपेक्षाभंग करू नये.

परवा रोहन ने इच्छा व्यक्त केली कि मी दुपारी त्याच्याबरोबर जेवावे. स्थळ: एबनी नामक आधुनिक खानावळ, अर्थात हॉटेल. मी एरवी अशा महाग ठिकाणी जात नाही जिथे खाल्ल्यावर घरी परत येण्यासाठी पैसे उरत नाहीत. पण रोहन ने आमंत्रण दिल्यामुळे गेलो.

तिथे जाऊन टेबलापाशी बसल्यानंतर फार काही करण्यासारखे नव्हते. थोडा काळ असाच लोटला. त्यानंतर अचानक तिथे चार सुंदर्या अवतरल्या. त्यामधली एक तर फारच सुंदर होती. मला तिला सांगावेसे वाटत होते कि देवाने माझ्या वाटेचे सौंदर्य सुद्धा तुलाच दिले आहे. चल, माझा वाटा परत कर. पण त्यांच्यासोबत एक मुलगाही होगा. वयाने लहान होता पण देहाने मोठा होता. अशा प्रकाराला सहसा भाऊ म्हणतात. त्यामुळे माझ्या वाट्यात आलेले थोडे फार सौंदर्य माझ्याच कडे राखत मी स्वस्त बसून राहिलो. नाहीतर अजून कुरूप व्हायची पाळी आली असती.

ती सुंदरी एवढी देखणी होती कि काय सांगू. सर्वप्रथम त्या मुलीच्या पालकांचे कौतुक करावे तेवढे कमी. तिला लहानपणी पासूनच चांगले वळण लावले असावे. मोठी झाल्यावर चांगलीच वळणदार झाली होती. मोठाले, मांजरीसारखे डोळे. बहारदार कचपाश (म्हणजे केसच न हो?). त्वचा तर एवढी लवचिक कि हात लावला तर बोटांचे ठसे उमटतील कि काय अशी शंका यावी. तिला दोहा विमानतळावर ठेवल्यास विद्युत उपकरणांचा खर्च वाचेल. प्रवाश्यांच्या बोटांचे ठसे घेण्यासाठी फारच टुकार दर्जाचे उपकरण त्या विमानतळावर लावण्यात आले आहे. असा काही रुचकर उपाय दिल्यास लोक सुद्धा जास्त प्रवास करतील.

लेखाचा प्रवाह विस्कळीत पाडत एक गोष्ट सांगू इच्छितो. लहानपणी मराठी व्याकरणाच्या वर्गात नुसते बाईं कडेच लक्ष्य दिल्यामुळे (त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष्य न दिल्यामुळे) कधी कधी वाक्य बनवताना त्रास होतो. उदाहरण पुढच्या वाक्यात मिळेल.

ती मुलगी एवढी सुंदर होती कि मी तिची काढली असती तर तिने घातला असता दृष्ट घोळ. मागील वाक्यातील शब्दांचा क्रम काहीसा चुकला असावा पण आशा करतो तुम्ही भावनांना समजला असाल. भावनांना समजणे फार महत्त्वाचे आहे कारण भावना कधीच आपल्यासारख्यांना समजून घेणार नाहीत. "आपल्यासारख्यांना" ह्या शब्दाचा प्रयोग आदरार्थी केला असल्याचे लक्ष्यात घ्यावे. आणि शब्दांचा क्रम चुकलेल्या वाक्यात दृष्ट आणि घोळ या शब्दांच्या ऐवजी तुम्ही दुसरे कोणते शब्द वापरण्याचा धोका पत्कर्लात तर ती माझी जवाबदारी नाही. फार तर दृष्ट-घोळ ऐवजी समजुत-गोंधळ किंवा चूक-वाद हे शब्द वापरावेत. त्यापलीकडे नको. नाहीतर तिला सारख्या उचक्या येत राहतील.

मी तिच्याकडे एकटक बघतो आहे हे बहुदा कोणाच्यातरी ध्यानात आले असावे आणि त्या इसमाने तिच्या ओळखीच्या व्यक्तीला कळवले असावे. कारण मधेच तिचे भ्रमणध्वनीयंत्र वाजले. बोलणे सुरु होताच तिचा चेहरा प्रफुल्लीत झाला. ती तिच्या हृदयाच्या ठोक्याशी बोलत असावी. (मागील वाक्यातील सगळे शब्द महत्वाचे आहेत त्यामुळे कुठलाही शब्द वाचून न वाचल्यासारखा करू नये, याने अर्थाचा अनर्थ होऊ शकतो).

ती बोलत असताना अधून मधून तिचे सुंदर सफेद दातही दिसत होते. माझेही दात काही कमी नाहीत. वाक्यातील “कमी” या शब्दाची खुण संख्येकडे नसून शुभ्रतेकडे आहे. दातांची संख्या बत्तीस असते. तुमच्याकडे त्यापेक्षा जास्त दात असतील तर बत्तीसाच्या वर जेवढे आहेत ते तोंडात पुरू शकत नाहीत. त्यामुळे ते कुठे आहेत हे तुमचे तुम्हालाच माहित.

एक बियर संपल्यानंतर त्या सुंदर तरुणीला जाण्यापूर्वीची भेट म्हणून एक मुका द्यावासा वाटला. फारतर तिला जर आवडला नसता तर तिने परत केला असता. पण या भीतीने, कि तिला आवडला आणि तिने आपल्याकडे ठेवून घेतला, तर माझा एक मुका वाया जाईल, मी तसे केले नाही.

नेहमीप्रमाणे बघत बसण्यात पटाईत असल्यामुळे ती असतानाही तिच्या कडे बघत बसलो आणि ती निघताना ही तिच्याकडे बघत बसलो. आणि बघता बघता माझीही जाण्याची वेळ आली. जशी आताही आली आहे. लेख वाचल्या बद्धल आभार.

14 comments:

Parikshit said...

मला तिला सांगावेसे वाटत होते कि देवाने माझ्या वाटेचे सौंदर्य सुद्धा तुलाच दिले आहे. चल, माझा वाटा परत कर. this was the best part.

Mohit said...

Thanks, Parya. You are my man! Found it tough to write a post in Marathi. Had to wait a wee bit before I could remember some words. Shows how many English and Hindi words we use while speaking in Marathi.

Kuldeep said...

जिंकलेस मित्रा, मला माहिती नव्हते तुझे मराठी इतके चांगले आहे... just awesome. I just forgot that you wrote it, कुणीतरी निष्णात लेखकाने लिहिल्याप्रमाणे वाटले... Keep it up!!

Mohit said...

Kuldippa, thanks man! Shudhhalekhanaawar thode kaam karayla laagel mala. Pan pahila lekh mhanun chalun jaail kadachit. Appreciation from someone like you whose own Marathi is excellent means a lot to me :) Will call you soon. I was not able to get you what I'd promised to you in daru ka nasha :) We'll talk. And hopefully I can arrange something the next time I go to Redmond :)

Laxmi Salgaonkar said...

akkha lekh vachayala ek taas lagla!! Tari hi mi akkha vachla!! Maza Marathi pan sudharala.....
Bapre.....yevhda marathi kuthe shiklas?
Ani sagle mukey kona sathi save karto aahes? saang saaang!!!

Mohit said...

Thanks Laxmi Tai :) sagle muke bahutek kutchya tari muki la dein. kamit kami kahi bolnar tari nahi.

Dreamchase7 said...

best marathi blog ever! kya baat hai!

Mohit said...

OMG, thanks so much Shrikant!!! Keeps me going :)

i.think said...

awesome man....amul butterchya ladivarun garam garam suri gelyasarkha lekh lihila ahe.....butterla pan kalale nahi ki don tukde kadi zale.....lai bhari!!!!

Mohit said...

Dhanyawaad, Sushil :) Evdhya stutichi mala saway nahi :) Means a lot to me, thanks again!!!

Mikilodeon said...

tula ek camera bhet dyavasa vatat ahe...

Mohit said...

De na, Mikil. Majhya ghari phaar zaga aage camera thhevnyasathhi ;)

Manoj Joshi said...

jabarjast Thokya! thok diya tu to! ajun havey ajun havey..

Mohit said...

Manoj saheb, I knew you would pick that one! Thanks for reading garibaacha blog! Cheers!